मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आवाहनाला मोठा प्रतिसाद, कोल्हापुरात आजी-माजी सैनिकांनी केले रक्तदान

880

राज्यातील रक्ताचा तुटवडा दूर करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आवाहनानंतर कोल्हापूरकर रक्तदानासाठी सरसावले आहेत.अनेक गावात रक्तदान शिबिराला मोठा प्रतिसाद मिळत आहे. सैनिकांचे गाव अशी ओळख असलेल्या गिरगांव मध्येही रक्तदानासाठी मोठी गर्दी झाली होती. यामध्ये महिलांसह आजी-माजी सैनिकांनीही सहभाग नोंदवला होता. देशाच्या रक्षणासाठी बहाद्दर सैनिक देणारे गाव अशी ओळख आणि परंपरा असलेल्या या गावातील तरुण एकीकडे निधड्या छातीने सीमेवर लढत आहेत, तर करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात रक्ताचा तुटवडा होऊ नये यासाठी माजी सैनिक सामाजिक कर्तव्य बजावत आहेत. आखून दिलेले नियम, आवश्यक ते अंतर ठेवून हे रक्तदान शिबिर घेण्यात आले. छत्रपती प्रमिलाराजे शासकीय रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टर आणि कर्मचारी यांच्या देखरेखीखाली हे शिबीर झाले.

आपली प्रतिक्रिया द्या