कोरोनाशी लढणाऱ्या कर्मचाऱ्यांना रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटलचा मदतीचा हात

470

कोरोनाशी मुकाबला करणारे कर्मचारी खरे हिरो आहेत, अशा शब्दांत रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटलचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. तरंग ग्यानचंदानी यांनी कौतुक केले आहे. अशा कर्मचाऱ्यांचा अभिमान असून या कर्मचाऱ्यांना संस्थेतर्फे मदत देण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. या कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांच्या कटुंबियांना मदत होण्यासाठी याचा उपयोग होणार आहे.

कोरोनाच्या कठीण काळात सक्रीयतेने सहभागी होणाऱ्या कर्मचाऱ्यांना एक महिन्याचे अतिरिक्त वेतन देण्यात येणार आहे. सेव्हन हिल आणि दोन आयसोलेशन रुममध्ये हे कर्मचारी कार्यरत होते. लॉकडाऊमुळे जीवनावश्यक वस्तू मिळण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे आमच्या कर्मचाऱ्यांना धान्य पुरवण्यात आले आहे. कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या आणि संक्रमणाचा धोका असणाऱ्या ठिकाणी वावरणाऱ्या कर्मचाऱ्यांना पीपीई किट देण्यात आले आहेत. तसेच 15 मार्चपासून व्हिसिटिंग कन्सलटंट (वैद्यकीय, सर्जिकल) यांच्याकडून अॅफिलेशन शुल्क आकारण्यात येणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

रुग्णालयात येणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी बस आणि खानपानाची सुविधा देण्यात आली आहे. तसेच कार्यरत असणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना जेवणासह इतर आवश्यक सेवाही पुरवण्यात येत आहेत. तसेच कर्मचारी किंवा त्यांच्या कटुंबियांना कोरोनाचे संक्रमण झाल्यास त्यांच्या उपचाराचा खर्च संस्था करणार आहे. कर्मचाऱ्यांसाठी या सुविधा दिल्याबद्दल आम्ही संस्थेच्या अध्यक्षा नीता अंबानी यांची आभार मानतो, असेही पत्रात नमूद करण्यात आले आहे. तसेच या बिकट काळात घरातच राहून जनतेने आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहनही ग्यानचंदानी यांनी केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या