गणपतीबाप्पा मोरया…! गणेशोत्सव मंडळांना आजपासून ऑनलाइन परवानगी

447

कोरोनाचा प्रादुर्भाव असल्यामुळे या वर्षी मुंबईत सोशल डिस्टन्सिंग पाळून आणि आवश्यक खबरदारी घेऊनच गणेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे. यासाठी आज 10 जुलैपासून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना परवानगीसाठी पालिकेकडे ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. विशेष म्हणजे, गेल्या वर्षीच्या परवानगीच्या आधारावर परवानगी देण्यात येणार असून पोलीस आणि अग्निशमन दलाकडे जाण्याची गरज भासणार नाही.

मुंबईत सुमारे 12 हजार छोटी-मोठी गणेशोत्सव मंडळे आहेत. या सर्व मंडळांना गणेशोत्सव साजरा करण्यासाठी पालिकेकडून रीतसर परवानगी घ्यावी लागते. साधारणतः जूनपासून परवानगीची प्रकिया सुरू होते. मात्र या वर्षी कोरोनाचा प्रभाव असल्यामुळे परवानगी प्रक्रिया 10 जुलैपासून सुरू होत आहे. विशेष म्हणजे, परवानगीसाठी आकारण्यात येणारे 100 रुपयांचे नाममात्र शुल्कही या वर्षी घेतले जाणार नाही.

असा करा अर्ज
कार्यपद्धती-पालिका पोर्टलवरील -ऑनलाइन सेवा- परीरक्षण-गणपती/नवरात्री टॅबखाली गणपती/नवरात्री मंडप ऍप्लिकेशनमध्ये नमूद करण्यात आलेल्या लिंकनुसार अर्ज सादर करावा. कोणतीही अडचण असल्यास संबंधित सहाय्यक आयुक्तांशी संपर्क करावा.

19 ऑगस्टपर्यंत मुदत
– अर्जदार पालिकेकडे 19 ऑगस्टपर्यंत सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत कुठूनही, कधीही अर्ज करू शकणार आहे.
– ऑनलाइन अर्जाची सुविधा मुंबई महानगरपालिकेच्या https://portal.mcgm.gov.in या वेब पोर्टलवर मराठी व इंग्रजी भाषांमध्ये उपलब्ध आहे.

आपली प्रतिक्रिया द्या