आयसीसीच्या मुख्यालयात कोरोनाचा शिरकाव, आयपीएलही संकटात

आयसीसीच्या दुबईतील मुख्यालयातही आता कोरोनाचा शिरकाव झाला आहे. या मुख्यालयातील काही कर्मचाऱयांना कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त समोर आले आहे. यामुळे यूएईत सुरू असलेली आयपीएल स्पर्धाही संकटात सापडली आहे. मात्र आयपीएलला कोणताही धोका नसल्याचे आयसीसीकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

ट्रेनिंग सेंटर मुख्यालयापासून दूर

आयसीसीच्या मुख्यालयात कोरोनाबाधित सापडले आहेत. आयपीएलमधील काही संघांतील खेळाडू आयसीसीच्या दुबईतील ऍकॅडमीमध्ये सराव करीत आहेत. यावेळी याचा परिणाम आयपीएलवर होणार का, असा प्रश्न सर्वांनाच यावेळी पडला. पण मुख्यालय व ट्रेनिंग हे जवळजवळ नसून मुख्यालयातील एकही व्यक्ती सरावाकडे गेलेली नाही, अशी माहिती सूत्रांकडून यावेळी देण्यात आली.

विलीगीकरण अन् सॅनिटायझेशन

मुख्यालयात काही कर्मचाऱयांना कोरोनाची लागण झाल्यानंतर त्या सर्वांनाच विलीगीकरणात ठेवण्यात आले आहे. तसेच कर्मचाऱयांना वर्क फ्रॉम होम करण्याचा आदेशही देण्यात आला आहे. काही दिवस हे कार्यालय बंद ठेवण्यात येणार आहे. तसेच संपूर्ण कार्यालय सॅनिटायझेशनही करण्यात येणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या