कोरोनाचा झटका, खेळाडूंना फटका; आधी कोट्यवधीची बोली, आता खाली होणार झोळी

649

कोरोनामुळे जगभरातील क्रीडा स्पर्धांचा खेळखंडोबा झाला आहे. अनेक स्पर्धा रद्द करण्यात आल्या आहेत, तर काही लांबणीवर टाकण्यात आल्या आहेत. हिंदुस्थानात रंगणाऱ्या इंडियन प्रीमिअर लिगवरही (आयपीएल) कोरोनाचा प्रभाव पडला आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे ही स्पर्धा।पुढे ढकलण्यात आली आहे. यंदाचा 13 व हंगाम 29 मार्च पासून सुरू होणार होता, परंतु आता ही स्पर्धा 15 एप्रिलला सुरू होईल. मात्र कोरोनामुळे परिस्थिती बिघडल्यास स्पर्धा रद्द करण्याचा निर्णयही घेतला जाऊ शकतो. यामुळे बीसीसीआय आणि आयपीएलच्या 8 संघातील खेळाडू, मालकांना कोट्यवधींचा फटका बसू शकतो.

आयपीएलच्या 13 व्या हंगामासाठी गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये बोली लागली होती. या लिलावात विदेशी खेळाडुंना जास्त मागणी असल्याचे दिसले. त्यातल्यात्यात ऑस्ट्रेलियन खेळाडूंवरबोलीसाठी सर्वच संघांमध्ये रस्सीखेच पाहायला मिळाली. लिलावात ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सला 15.5 कोटींना, ग्लेन मॅक्सवेलला 10.75 तर नॅथन कुल्टर नाईल 8 कोटींना विकत घेतले होते. मात्र आता कोरोनामुळे सर्व देशांनी व्हिसा सेवा आणि प्रवासावर बंदी घातली आहे. त्यामुळे आयपीएलचा 13 वा हंगाम 15 एप्रिलपासून सुरू झाला तरी विदेशी खेळाडूंना या स्पर्धेत सहभागी होता येणार नाही. कोरोनामुळे एका फटक्यात या खेळाडूंना कोट्यवधींचा फटका बसू शकतो.

दरम्यान, क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे मुख्य कार्यकारी केविन रॉबर्ट्स यांनी, आयपीएल 2020 मध्ये भाग घेण्याचा निर्णय खेळाडूंचा असेल, आम्ही यात हस्तगत करणार नाही. मात्र तर सरकारने प्रवासाची परवानगी न दिल्यास याला आम्ही जबाबदार असणार आहे, असे मत व्यक्त केले होते.

बीसीसीआयलाही नुकसान
आयपीएल स्पर्धा रद्द झाल्यास बीसीसीआयला मोठा दणका बसणार आहे. आयपीएल रद्द झाल्यास बीसीसीआयला 10 हजार कोटी रुपयांचा तोटा होऊ शकतो. ‘क्रिकट्रॅकर’ने दिलेल्या वृत्तानुसार आयपीएल रद्द झाल्यामुळे बीसीसीआयचे मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते. ही रक्कम दहा हजार कोटी रुपयांपर्यंत जाऊ शकते. इतकेच नव्हे तर आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलचे प्रायोजकत्व, माध्यम हक्क, फ्रेंचायझी महसूल यांनाही कोट्यवधींचा तोटा होऊ शकतो.

आपली प्रतिक्रिया द्या