जालना : शहरातील लॉकडाऊन 20 जुलैपर्यंत वाढवला

446

कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी जालना शहरात लागू करण्यात आलेल्या लॉकडाउन पुन्हा पाच दिवसांनी वाढविण्यात आला आहे. जालना शहरात 20 जुलैच्या सकाळी नऊ वाजेपर्यंत लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. ही माहिती जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी दिली आहे.  जालना शहरात 5 जुलै पासून 15 जुलैपर्यंत लॉकडाऊन घोषित करण्यात आला होता. बुधवार म्हणजेच आज या लॉकडाऊनचा शेवटचा दिवस होता. चार दिवसांवर श्रावण महिना येऊन ठेपल्याने गुरूवारी लॉकडाउन उघडल्यावर शुक्रवार, रविवार या दोन दिवसांमध्ये मटन दुकाने व दारूच्या दुकानांवर मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. परिणामी शहरात पुन्हा गर्दी झाल्यास कोरोनाचा प्रसार अधिक होण्याची शक्यता असल्याने हा लॉकडाऊन 20 जुलैच्या सकाळी नऊ वाजेपर्यंत वाढविण्यात आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या