लॉकडाऊनमुळे ‘एक गाव भुताचा’ मालिकेचे चित्रीकरण थांबवले

रत्नागिरी तालुक्यातील नाचणे गावात झी मराठी वाहिनीवरील ‘एक गाव भुताचा’ या मालिकेचे चित्रीकरण सुरू होते. ही चित्रीकरण लॉकडाऊनमुळे थांबविण्यात आले आहे.रत्नागिरीत आजपासून आठ जुलैपर्यंत कडक लॉकडाऊनचे आदेश जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा दिले आहेत. यामुळे ‘एक गाव भुताचा’ या मालिकेच्या चित्रीकरणाला आठ दिवस विश्रांती देण्यात आली आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाबाधित रूग्णांची संख्या सहाशेच्या घरात पोहचली आहे. यामुळे कोरोना विषाणू प्रसाराची साखळी तोडण्यासाठी आठ दिवसाचा लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे.अत्यावश्यक सेवा वगळता अन्य कुणालाही घरातून बाहेर पडता येणार नाही. यामुळे वैभव मांगले यांची प्रमुख भूमिका असलेली या मालिकेचे चित्रीकरणही थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या