नवी मुंबईतील इतर राज्यातील नागरिकांना शिवसेनेचा आधार

700

लॉकडाऊनमुळे नवी मुंबईतील वाशी परिसरात अडकून पडलेल्या इतर राज्यातील नागरिकांना शिवसेनेने आधार दिला आहे. या नागरिकांना अन्नधान्य आणि अन्य जिवनावश्यक वस्तू घरपोच करण्यात आल्या आहेत. पश्चिम बंगालमधील बेहरामपूर भागातील अनेक कुटूंबे नवी मुंबईत उदारनिर्वाहासाठी आली आहेत. लॉकडॉऊनमुळे त्यांची सर्व कामे बंद झाल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली. त्यांनी आपले स्थानिक खासदार आणि लोकसभेतील काँग्रेसचे गटनेते अधिर रंजन चौधरी यांना फोन केला आणि आपली व्यथा त्यांच्या कानावर घातली. त्यानंतर चौधरी यांनी शिवसेना खासदार विनायक राऊत यांच्याशी संपर्क साधला आणि वेगाने हालचाली झाल्या. शिवसेना नवी मुंबई जिल्हाप्रमुख द्वारकानाथ भोईर यांनी अडचणीत सापडलेल्या या नागरिकांना 15 दिवस पुरेल इतके अन्नधान्य आणि अन्य जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले.

आपली प्रतिक्रिया द्या