कोरोनामुक्त रुग्णांची संख्या दीड लाखाच्या उंबरठ्यावर, राज्यात एक लाख रुग्णांवर उपचार सुरू

353

राज्यात आज ३३४० रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५५.१५ टक्के असून आतापर्यंत बरे होणाNयांची एकूण संख्या १ लाख ४० हजार ३२५ झाली आहे. कोरोनाच्या ७८२७ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या १ लाख ३ हजार ५१६ रुग्णांवर (अॅक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.
राज्यात आज १७३ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ४.४ टक्के एवढा आहे. राज्यात नोंद झालेले १७३ मृत्यू हे मुंबई मनपा-४४, ठाणे-६, ठाणे मनपा-२२, नवी मुंबई मनपा-१०, कल्याण-डोंबिवली मनपा-५, उल्हासनगर मनपा-१, भिवंडी-निजापूर मनपा-२, मीरा-भार्इंदर मनपा-२, पालघर-१, वसई-विरार मनपा-७, रायगड-१, पनवेल मनपा-१, नाशिक-१, नाशिक मनपा-७, धुळे-२, जळगाव-२, पुणे-५, पुणे मनपा-२२, पिंपरी-चिंचवड मनपा-१०,सोलापूर मनपा-३, कोल्हापूर-१, रत्नागिरी-१,संभाजीनगर-१, संभाजीनगर मनपा-५ इतर जिल्ह्यांचा समावेश आहे.

मुंबईत १,२६३ नवे रुग्ण, ४४ जणांचा मृत्यूर्
मुंबईत एका दिवसात कोरोनाचे १,२६३ नवे रुग्ण सापडले असून गेल्या ४८ तासांत ४४ जणांचा मृत्यू झाला आहे तर गेल्या २४ तासांत १,४४१ जण कोरोनामुक्त झाले असून मुंबईत एवूâण कोरोनामुक्त होणाNयांची संख्या आता ६४ हजार ८७२ वर पोहोचली आहे. मुंबईत ४४ जणांचा मृत्यू झाल्याने एवूâण मृतांची संख्या आता ५ हजार २८५ झाली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या