कोरोनापासून वाचण्यासाठी संत्र्याच्या सालीचे मास्क! चिनी लोकांची अजब शक्कल

2337

कोरोना व्हायरसमुळे सध्या चीनसह अनेक देशांमध्ये दहशतीचं वातावरण आहे. सगळ्या जगात 9816 जण कोरोनाने संक्रमित झाले आहेत. त्यातले 9692 एकट्या चीनमध्येच आहेत. कोरोना संसर्गजन्य असल्यामुळे चिनी नागरिक तोंड झाकून सर्वत्र वावरताना दिसत आहेत. पण, रोगाला रोखण्यासाठी चिनी लोकांनी लढवलेली शक्कल अजूनच बुचकळ्यात पाडणारी आहे.

चीनमध्ये सध्या मास्कसाठी अचानक मोठी मागणी निर्माण झाली आहे. पण, एकूणच चीनची लोकसंख्या आणि मास्कचा पुरवठा यांच्या प्रमाणाचा मेळ न बसल्याने अनेक जणांना मास्क मिळालेले नाहीत. त्यामुळे चिनी लोकांनी वेगवेगळ्या शकला वापरत मास्क तयार केले आहेत. तोंड झाकण्यासाठी मास्क कमी पडल्याने फळे, प्लास्टिक, कागद, कापड अशा निरनिराळ्या वस्तुंचा वापर केला जात आहे.

mask-bra-china

काही जण संत्र्याची साल मास्क म्हणून वापरताना दिसत आहेत. तर काहींनी मोठ्या आकाराची मिनरल वॉटरची बाटली पाणबुड्याप्रमाणे डोक्यात घालून संरक्षण मिळवलं आहे. काही जण ब्रा कप्सचा वापर मास्क म्हणून करत आहेत. काहींनी तर चक्क सॅनिटरी नॅपकिनच तोंडावर धरला आहे. मास्कची कमतरता निर्माण झाल्याने काही ठिकाणी सेकंड हँड मास्कची मागणीही वाढताना दिसत आहे. पण, अशा प्रकारचे मास्क वापरण्यापासून मनाई करण्यात आली आहे.

mask-sanitary-napkin-china

आपली प्रतिक्रिया द्या