कल्याण डोंबिवलीत कोरोनाचे संकट वाढले; एकाच दिवशी पाच महिलांना लागण

436

कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात कोरोनाचे संकट वाढत आहे. कोरोनाचा फैलाव झपाट्याने होत असून गुरुवारी एकाच दिवशी पाच महिलांना कोरोनाची लागण झाल्याने खळबळ उडाली आहे. आतापर्यंत कोरोना बाधितांचा आकडा 43 वर गेला आहे.

ठाणे जिल्ह्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण कल्याण डोंबिवलीत आढळले आहेत. दररोज नव्याने कोरोनाबाधीत नवे रूग्‍ण आढळून येत असल्याने प्रशासन अधिक सतर्क झाले आहे. एकाच दिवसात पाच महिलांना कोरोनाची लागण झाली आहे, त्यात कल्‍याण पूर्वेच्या 2, डोंबिवली पूर्वेच्या एक, डोंबिवली पश्चिमच्या एक महिलेचा समावेश आहे. या सर्व महिला 35 ते 55 वयोगटातील आहेत. पालिका क्षेत्रातील रूग्‍णसंख्‍या 43 झाली आहे. या सर्वांवर मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक कोरोना रुग्ण कल्याण डोंबिवलीत सापडत असल्याने दोन्ही शहरात लॉक डाऊनची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात येत आहे. आतापर्यंत कल्याण पूर्वेत 8, कल्याण पश्चिमेला 7, डोंबिवली पूर्वेला 20, डोंबिवली पश्चिमेला 7 तर टिटवाळामध्ये कोरोनाचा एक रुग्ण आढळला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या