टेडी बेअर्स देतायत सोशल डिस्टन्सिंगचा संदेश, पॅरिसमधील कॉफी शॉपच्या मालकाची आयडियाची कल्पना

406

कोरोनाच्या महामारीत संसर्ग टाळण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग राखणे खूप महत्त्वाचे आहे. ग्राहकांना सोशल डिन्स्टन्सिंगचा संदेश देण्यासाठी पॅरिसमधील एका कॉफी शॉपमध्ये अनोखी शक्कल लढवली आहे. ग्राहकांनी एकमेकांपासून सोशल डिस्टन्सिंग राखावे यासाठी काही खुर्च्यांवर चक्क मोठय़ा आकाराचे टेडी बेअर्स ठेवण्यात आले आहेत. हॉटेलमालकाची ही आयडियाची कल्पना सध्या सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.

जगभरातील वेगवेगळ्या देशामध्ये हॉटेल, कॅफे सुरू झाली आहेत. नव्या नियमांप्रमाणे ग्राहकांच्या सुरक्षेसाठी हॉटेलमालकांनी काचांचे पार्टीशन टाकणे, मर्यादित ग्राहकांना प्रवेश देणे, टेबल्सची संख्या कमी करणे अशा विविध उपाययोजना राबविल्या आहेत. मात्र सोशल डिस्टन्सिंगचा संदेश देण्यासाठी पॅरिसमधील कॉफी शॉपच्या मालकाने लढवलेली अनोखी शक्कल सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. या कॉफी शॉपचे फोटो सोशल मिडीयावर व्हायरल होत आहेत. यात कॅफेसमोरील फुटपाथवजा जागेवरील टेबलांवर ग्राहकांनी एकमेकांपासून अंतर ठेऊन बसावे म्हणून येथे चक्क मोठ्या आकाराचे टेडी बेअर ठेवले आहेत. अगदी एखाद्या व्यक्तीच्या आकाराचे चॉकलेटी रंगाचे हे टेडी बेअर खुर्च्यांवर ठेवल्याने ग्राहकांना उरलेल्या खुर्च्यांवरच बसावे लागत आहे. त्यामुळे आपसुकपणे दोन व्यक्तींमध्ये अंतर राखले जात आहे.

आपली प्रतिक्रिया द्या