‘जलसा’चं फाटक पुन्हा तुमच्या प्रेमाने गजबजेल

584

बॉलीवूडचे शहेनशहा बिग बी अमिताभ बच्चन यांना कोरोना संसर्ग झाला असून त्यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून नानावटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बिग बींचा जगभरात करोडो चाहता वर्ग आहे. त्यांची एक झलक बघण्यासाठी हजारो चाहते मुंबईला येतात. जुहू येथील प्रतीक्षा आणि जलसा बंगल्यासमोर दररोज गर्दी करतात. सध्या अमिताभ यांच्या बंगल्याचे फाटक ‘सील’ आहे; ते पुन्हा चाहत्यांच्या प्रेमाने गजबजून जाईल, अशी अपेक्षा शनिवार अमिताभ यांनी व्यक्त केली.

‘जलसा बंगल्यांचं हे फाटक सील आहे. मात्र आशेवर जग कायम आहे. परमेश्वराची इच्छा असेल तर फाटक पुन्हा त्याच प्रेमानं भरून जाईल’, अशी पोस्ट अमिताभ यांनी इन्स्टाग्रामकर लिहिली. त्यांच्या या पोस्टवर चाहत्यांच्या भरपूर कमेंट येत आहेत. अमिताभ लवकर बरे व्हावेत, म्हणून सदिच्छा व्यक्त करत आहेत.

असाच दुर्मिळ फोटो अमिताभ यांनी ट्विटरवरही शेअर केला आणि त्यांनी म्हटलंय, ’तुम्ही ज्या प्रेम आणि सहकार्याच्या भावनेतून हे हात उंचावले आहेत, त्यामुळे माझी ताकद वाढली आहे. हे क्षण माझ्या आयुष्यातून कधीही पुसले जाणार नाहीत… तर देवा मला मदत कर,’ अशी पोस्ट बिग बी यांनी लिहिली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या