सीबीएसई बारावीची परीक्षा होणार सोपी, बहुपर्यायी, लघुत्तरी प्रश्नांवर भर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सीबीएसई बोर्डाने 2021 मध्ये होणाऱ्या बारावीच्या परीक्षेचा पेपरपॅटर्न बदलला आहे. परीक्षेत बहुपर्यायी प्रश्नांचे प्रमाण 50 टक्क्यांपर्यंत वाढविण्यात आले असून लघुत्तरी प्रश्नांनाही स्थान देण्यात आले आहे. त्यामुळे आता बारावीची परीक्षा विद्यार्थ्यांसाठी सोपी होणार आहे.

कोरोनाच्या पाश्वभूमीवर सीबीएसईने याआधीच दहावी, बारावीचा पेपरपॅटर्न 30 टक्क्यांपर्यंत कमी केला आहे. आणि आता परीक्षेच्या पेपरपॅटर्नमध्येही बदल केला आहे. बोर्डाने गुणात्मकदृष्टय़ा बहुपर्यायी प्रश्नांना प्रश्नपत्रिकेत सर्वाधिक स्थान दिले आहे. त्याचबरोबर केस स्टडीज आधारित प्रश्नांचे प्रमाणही वाढवले आहे.

प्रश्नपत्रिकेतील काही प्रमुख बदल

  • बहुपर्यायी प्रश्न वाढले
  • इंग्रजीविषयात सुमारे 50 टक्के प्रश्न बहुपर्यायी
  • गणित आणि फिजिक्समध्ये केसस्टडीवर आधारित प्रश्न
  • भौतिकशास्त्र्ाात विचारकाैशल्य, तका&वर आधारित प्रश्न
  • जीवशास्ञात एकेका गुणांचे लघुत्तरी प्रश्न
  • गणितातील प्रश्नांची संख्या 36 वरून 38 केली
  • अर्थशास्त्रातील बहुपर्यायी प्रश्नांची संख्या 8 वरून 20 केली.

1 डिसेंबरपासून मुक्त विद्यालयाचे प्रवेश सुरू

मुक्त विद्यालय मंडळाची प्रवेश प्रक्रिया 1 डिसेंबरपासून आँनलाईनपद्धतीने सुरू होणार आहे. पाचवी आणि आठवीच्या अभ्यासक्रमांना इच्छुकांना प्रवेश घेता येईल. 1 ते 31 डिसेंबरपर्यंत इच्छुक विद्यार्थी नावनोंदणी अर्ज करू शकतात.

2 डिसेंबर ते 2 जानेवारी या कालावधीत मूळ अर्ज, शुल्क व मूळ कागदपत्रे अर्जावर नमूद केलेल्या संपर्ककेंद्रात जमा करायचे असून 8 जानेवारीपासून संपर्क केंद्रांनी अर्जाची यादी विभागीय शिक्षण मंडळाकडे जमा करायची आहे. नावनोंदणीसाठी वेबसाईट http://msbos.mh-ssc.ac.in