जीवनावश्यक सोयी सुविधा सुरूच राहणार; बाजारपेठेत गर्दी करू नये – मुख्यमंत्री

1244

आज रात्री 12 वाजल्यापासून पुढील 21 दिवसांपर्यंत देशात लॉकडाऊन करणार असल्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केले आहे. यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला आहे. ‘माझे पंतप्रधान नरेंद्र मोदींशी बोलणे झाले आहे. राज्यात जीवनावश्यक सोयी व सुविधा सुरूच राहतील. कोणीही घाबरु नये आणि रस्त्यावर, बाजारपेठेत गर्दी करू नये.’, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.

‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे निवेदन दिले ते अत्यंत गांभीर्याने दिले आहे. ते ऐकल्यानंतर मी क्षणभर चरकलोच. लॉकडाऊन ही गोष्ट काळजाचा ठोका चुकवणारी आहे. माझ्याही मनात भीती आणि शंका निर्माण झाली की आता करायचे काय ? त्यानंतर मी पंतप्रधानांशी बोललो. त्यांना कल्पना दिली की जवळपास महाराष्ट्र आम्ही लॉकडाउन केलाच आहे. अत्यावश्यक सेवा सुरु ठेवाव्याच लागतील. त्यासाठी लागणारे कर्मचारीही आपल्याला ठेवावे लागतील अन्यथा गोंधळ निर्माण होईल. याची कल्पना मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिली,’ असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हणाले आहेत आहे. पुढील 20 दिवस खूप महत्वाचे आहेत, असेही मुख्यमंत्री म्हणाले आहेत.

 

आपली प्रतिक्रिया द्या