दहिसरमध्ये शिवसेनेच्या कोविड योद्ध्यांकडून घरोघरी तपासणी सुरू

1117

दहिसर पश्चिम प्रभाग क्रमांक 7 मधील शिवसेनेच्या स्वयंसेवकांनी ‘कोविड योद्धा’ म्हणून काम सुरू केले आहे. या उपक्रमात 25 हजार नागरिकांची घरोघरी जाऊन तपासणी करण्यात येणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर थर्मल गन चाचणी, लक्षणे तपासणे आणि आवश्यक तपासणी-मार्गदर्शन करण्यात येत आहे.

शिवसेना नगरसेविका आणि पालिकेच्या विधी समिती अध्यक्षा शीतल म्हात्रे यांच्या नगरसेवक निधीतून या कोविड योद्ध्यांना सुरक्षेसाठी हातमोजे, मास्क, सॅनिटायझर अशा सुविधांचे वाटप करण्यात आले. या कोविड योद्ध्यांना विभागप्रमुख आमदार विलास पोतनीस यांच्या वतीने अर्सेनिक अल्बम-30 औषध आणि फेस शिल्डचे वाटपही करण्यात आले. दरम्यान, नगरसेविका शीतल म्हात्रे यांच्या वतीने प्रभाग क्रमांक 7 मधील दोन हजार नागरिकांना आर्सेनिक अल्बम – 30 गोळ्यांचे वाटपही करण्यात आले. प्रभागातील सर्व नागरिकांना या गोळ्यांचे वाटप करण्यात येणार असल्याचे शीतल म्हात्रे यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या