डायमंड प्रिन्स जहाजावर अडकलेले गोव्याचे 50 खलाशी मायदेशी परतणार

513

जपानच्या किनाऱ्यावर अनेक दिवस रोखण्यात आलेल्या डायमंड प्रिन्स गोव्याच्या 50 खलाशांना इंडियन एअर लाईन्सच्या विमानाने मायदेशी आणले जात आहे. जहाजावरील 14 हिंदुस्थानी खलाशांना कोरोनाची लागण झाल्याचा संशय आहे. त्यामुळे अशा खलाशांना दिल्ली विमानतळावरून उपचारासाठी विशेष रुग्णालयांत पाठवले जाणार आहे

जहाजावर अडकलेल्या 124 हिंदुस्थानी खलाशांना एअरलिफ्ट करीत विमानाने मायदेशी आणले जात असल्याची माहिती अनिवासी हिंदुस्थानी आयुक्त नरेंद्र सावईकर यांनी दिली. सावईकर यांनीच हिंदुस्थानचे परराष्ट्रमंत्री डॉ.एस जयशंकर आणि जपानमधील हिंदुस्थानी राजदूत संजय कुमार शर्मा यांच्याशी संपर्क साधून हिंदुस्थानी खलाशांना मायदेशी आणण्यासाठी प्रयत्न केले.

पाकिस्तानातही कोरोनाचे दोन रुग्ण
पाकिस्तानातही भयंकर कोरोना विषाणूने बाधित झालेले दोन रुग्ण आढळले आहेत. त्या दोघांवरही योग्य ते उपचार सुरु असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पाकिस्तानी पंतप्रधानांचे विशेष वैद्यकीय सल्लागार डॉ.जफर मिर्झा यांनी दिली.हे रुग्ण पाकच्या इराण सीमेवरील तफ्तांन भागातून आले असावेत, मात्र पाकिस्तानी नागरिकांनी घाबरून जाण्याची गरज नाही कारण वैद्यकीय प्रशासनाने योग्य त्या उपाययोजना राबवल्या असल्याचे डॉ.मिर्झा यांनी स्पष्ट केले

आपली प्रतिक्रिया द्या