एकाच महिन्यात पिता, पुत्र, नातवाचा कोरोनाने घेतला बळी; एपीएमसीच्या भाजीपाला मार्केटवर शोककळा

934

एपीएमसीच्या भाजीपाला मार्केटमधील एका व्यापाऱ्याच्या घरातील पिता, पुत्र आणि नातवाचा कोरोनाने एकाच महिन्यात बळी घेतला आहे. घरातील कर्त्या पुरुषांचा असा दुर्दैवी अंत झाल्यामुळे या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून एपीएमसीच्या भाजीपाला मार्केटवर शोककळा पसरली आहे.

एपीएमसी चा भाजीपाला मार्केटमध्ये व्यवसाय करणारे हे तिघे पिता, पुत्र आणि नातू नेरूळ येथे राहत होते. गेल्या महिन्यात पित्याला ताप आला असता त्यांची कोव्हीडची टेस्ट करण्यात आली आणि त्यांना करुणा झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर मुलाच्या आणि नातवाची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली. एकाच घरात तिघांना कोरोनाची बाधा झाल्यामुळे संपूर्ण कुटुंब प्रचंड तणावाखाली आले. या तिघांना उपचारासाठी कोव्हीड सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. उपचार सुरू असतानाच 11 मे रोजी पित्याचा दुर्दैवी अंत झाला. त्यानंतर 23 मे रोजी नातवाची कोरोना बरोबर सुरु असलेली झुंज संपली. या दुःखा मधून संपूर्ण कुटुंब सावरत नाही तोच आज मुलाचाही कोरोनाने बळी घेतला. एकाच महिन्यात एकाच कुटुंबातील तीन कर्त्या पुरुषांचा असा दुर्देवी अंत झाल्यामुळे सर्वात नवी मुंबईत सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

70 जणांची कोरोनावर मात

कोरोनाचे रुग्ण मोठ्याप्रमाणात सापडल्यानंतर एपीएमसीचे पाचही मार्केट बंद करण्यात आली होती. सर्वाधिक रुग्ण भाजीपाला आणि धान्य मार्केट मध्ये सापडली होती. भाजीपाला मार्केटमधील 70 रुग्णांनी कोरोनावर मात करून पुन्हा मार्केटमध्ये येण्यास सुरुवात केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या