‘गुडबाय’साठी बुक केला संपूर्ण स्टुडिओ, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्मात्यांची खबरदारी

वाढत्या कोरोनाग्रस्तांच्या पार्श्वभूमीवर सावधगिरीचा उपाय म्हणून चित्रपट निर्माते आता शूटिंग करताना खबरदारी घेताना दिसत आहे. रविवारपासून महानायक अमिताभ बच्चन यांच्या ‘गुडबाय’ या चित्रपटाचे शूटिंग सुरू झाले आहे. या चित्रपटासाठी चांदिवलीतील संपूर्ण स्टुडिओ बुक करण्यात आला आहे. अन्य कोणत्याही चित्रपटांचे शूटिंग या स्टुडिओत पार पडणार नाही. या स्टुडिओत चंदिगड उभारण्यात आले आहे.

एकता कपूर या चित्रपटाची निर्मिती करणार आहे. यानिमित्ताने अमिताभ बच्चन आणि एकता कपूर पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहेत. शूटिंगचा अनुभव शेअर करताना बिग बी यांनी ब्लॉगमध्ये म्हटलंय, ‘शूटिंग स्थळावर खूप काळजी घेतली जात आहे. लोकेशनच्या चहुबाजूंनी 3 ते 4 वेळेस सॅनिटाइज केले जाते. फक्त एकाच चित्रपटासाठी पूर्ण स्टुडिओ बुक करण्यात आला आहे. त्यामुळे बरीच जागा रिकामी असते. कोरोना पसरू नये यासाठी ही खबरदारी घेतली आहे. हे पाहणेदेखील अविस्मरणीय आहे. कारण एकावेळी येथे दहा चित्रपटांची शूटिंग चालायची.’

आपली प्रतिक्रिया द्या