गोरेगावच्या संकल्प सहनिवास संकुलात 133 जणांनी केले रक्तदान

534

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रक्तदान करण्यासाठी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत गोरेगाव (पूर्व) येथील संकल्प सहनिवास संकुलात सोशल डिस्टंन्सिंगचे पालन करीत आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात संकुलातील 133 जणांनी रक्तदान केले. संकल्प फेडरल सोसायटी व त्यांच्या संलग्नीत संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने ‘हायटेक ब्लड बँक’च्या मदतीने संकुलातील सांस्कृतिक केंद्रात हा उपक्रम आयोजित करण्यात आला. रक्तदान केलेल्या रक्तदात्यांना ‘हायटेक ब्लड बँक’ कडून प्रमाणपत्रही देण्यात आले. रक्तदान शिबीराचे नियोजन फेडरल सोसायटीचे अध्यक्ष चंद्रकांत माने, उपाध्यक्ष विवेक माळवी, सचिव प्रदीप केदारे, खजिनदार सुबोध महाडीक, सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष राजेश लाड, उपाध्यक्ष धनंजय पानबुडे, सचिव अजय पवार, खजिनदार शैलेश शिरवाडकर तसेच अजय दुर्वास, हनुमंत सुळे, सचिन सावंत, दिलीप मोहीते, प्रदीप सावळ, प्रवीण पाटील, अरुण साटम व शिवाजी चव्हाण यांचे विशेष सहकार्य लाभले.

आपली प्रतिक्रिया द्या