दिल्लीच्या मरकजचे हिंगोलीतही कनेक्शन; एक कोरोना संशयीत जिल्हा रुग्णालयत

1690

दिल्ली येथे आयोजित ताबलीक जमात मरकजच्या कार्यक्रमाला हिंगोली जिल्ह्यातील 12 मुस्लिमांनी सहभाग नोंदविल्याची माहिती समोर आली आहे. यापैकी परतलेल्या एकाला पोलिस बंदोबस्तात जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये कोरोणा संशयित म्हणून दाखल करण्यात आले आहे. तर उर्वरित 11 जण दिल्लीतच अडकल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

दिल्लीच्या निजामुद्दीन परिसरामध्ये तबलीक जमात मरकजचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी हिंगोली जिल्ह्यातील बारा मुस्लिम दिल्लीत गेल्याची माहिती पोलिसांकडून प्राप्त झाली आहे. या बारापैकी वसमत येथील एक जण दिल्लीहून परत आल्यावर त्याला पोलिस बंदोबस्तामध्ये जिल्हा शासकीय रुग्णालयात कोरोना संशयित म्हणून कोरोन्टाइन करण्यात आले आहे. तसेच उपचारही सुरू करण्यात आले आहेत. या संशयिताच्या थ्रोट स्वाबचे नमुने संभाजीनगरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आले आहेत. हा संशयित रुग्ण हिंगोली जिल्ह्याच्या वसमत शहरातील असल्याचे प्रशासकीय सूत्रांनी सांगितले. तर उर्वरित 11 जण दिल्लीहुन अद्याप परत आले नसल्याचेही सांगण्यात आले. या सर्व बारा जणांची नावे निष्पन्न झाली असून आणखी कुणी हिंगोली जिल्ह्यातून दिल्लीच्या मरकाज मध्ये सहभागी झाले होते का याचा शोध पोलीस व जिल्हा प्रशासनाकडून घेतला जात आहे.

आपली प्रतिक्रिया द्या