वसमतला शिवसेनेच्या रक्तदान शिबिरात 71 रक्तदाते सहभागी; हिंगोली जिल्ह्यात अन्नदान व धान्य वाटप

1259

हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी येथे व्यापारी महासंघ व मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात साठ तर वसमतला शिवसेनेने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात 71 रक्तदात्यांनी सहभाग घेतला. यासोबतच जिल्ह्यामध्ये शिवसेनेसह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपाच्या वतीने अन्न -धान्य वाटप असे कार्यक्रम आज 31 मार्च रोजी घेण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्‍या लॉकडाऊनमुळे गोरगरीब व मजूरदार नागरिकांची उपासमार होऊ नये यासाठी विविध पक्ष व सामाजिक संघटना पुढे आल्या आहेत.

शिवसेनेकडून 40 क्विंटल अन्नधान्याचे वाटप

शिवसेनेचे आमदार व जिल्हाप्रमुख संतोष बांगर यांनी कळमनुरी विधानसभा क्षेत्रातील कोथळज येथे भटक्या विमुक्त बांधवांना पालावरती जाऊन जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. तसेच औंढा नागनाथ येथे गोरगरीब नागरिकांना धान्य वाटप करण्यात आले. यावेळी त्यांच्यासोबत समाजकल्याण सभापती फकीरराव मुंडे, राम कदम, अनिल देशमुख, जी. डी. मुळे, साहेबराव देशमुख, अनिल देव, बंडू चोंडेकर, राम मुळे, शंकर यादव यांची उपस्थिती होती. माजी आमदार गजाननराव घुगे यांनी देखील कळमनुरी तालुक्यात व शहरात जीवनावश्यक वस्तू व अन्नधान्याचे वाटप केले आहे. हिंगोली शहरामध्ये आमदार तानाजी मुटकुळे, नगराध्यक्ष बाबाराव बांगर व भाजपच्या कार्यकर्त्यांकडून बंदोबस्तावरील पोलिस तसेच गोरगरीब नागरिकांना दररोज पाचशे फुड पॅकेटचे वाटप केले जात आहे.

वसमतला शिवसेनेच्या रक्तदान शिबिर 71 दाते सहभागी

वसमत येथे शिवसेनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरामध्ये 71 रक्तदात्यांनी सहभाग घेतला. नांदेड येथील इंडियन रेडक्रॉस सोसायटी व पारसी अंजुमन ट्रस्टच्या रक्तपेढीच्या मदतीने या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरप्रसंगी खासदार हेमंत पाटील, माजी सहकारमंत्री डॉ. जयप्रकाश मुंदडा, शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुनील काळे, तालुकाप्रमुख बालाजी तांबोळी, नगराध्यक्ष श्रीनिवास पोराजवार, शहरप्रमुख काशिनाथ भोसले, डॉ. डी बी पार्डीकर यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.

शिवसेना जिल्हा परिषद गटनेत्यांची 51 हजाराची मदत

शिवसेनेचे हिंगोली जिल्हा परिषद गटनेते व औंढा तालुकाप्रमुख अंकुश आहेर यांनी कोरोनाविरुद्धच्या लढाईत मुख्यमंत्री सहायता निधीसाठी वयक्तिक 51 हजार रुपयांची मदत केली आहे. आहेर यांनी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्याकडे मदतीचा धनादेश सुपूर्द केला. यावेळी जि. प. सीईओ आर. व्ही. ए. शर्मा, जिल्हा नियोजन अधिकारी किरण गिरगावकर, उपमुख्यकार्यकारी अधिकारी धनवंतकुमार माळी उपस्थित होते.

कळमनुरीत साठ जणांचे रक्तदान

कळमनुरी येथील व्यापारी महासंघ व मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने डॉ. निलेश सोमाणी यांच्या रुग्णालयात आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरामध्ये 60 रक्तदात्यांनी सहभाग घेतला. मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष नंदकिशोर तोष्णीवाल यांच्यासह व्यापारी, पत्रकारांनी यासाठी प्रयत्न केले.

राष्ट्रवादी युवक काँग्रेस 300 कुटुंबीयांना मदत

हिंगोली शहरातील आझम कॉलनी व जवळच्या परिसरातील तीनशे गोरगरीब कुटुंबियांना तांदूळ, ज्वारी, गहू यांचे प्रत्येकी पाच किलोचे पॅकेट व गोड तेलाच्या पाकिटाचे वितरण राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रदेश सचिव जावेद राज यांच्यावतीने करण्यात आले.

काँग्रेसकडून अन्नदान व मास्क वाटप

हिंगोलीत शहर काँग्रेस पदधिकाऱ्यांनी शहरात विविध ठिकाणी गरजवंतांना भोजन व मास्क वाटप केले. अखिल भारतीय काँग्रेसचे गुजरात राज्याचे प्रभारी तथा राज्यसभा खासदार राजीव सातव यांच्या सुचनेनुसार हिंगोली शहरातील अकोला बायपास, रेल्वे स्टेशन, मोसीकॉल अशा विविध परिसरात भेटी देवून गरजवंतांना वरण, भात, भाजी, पोळीचे भोजन पुरवले. या उपक्रमात शहराध्यक्ष बापुराव बांगर, नगरसेवक माबुद बागवान, काँग्रेस प्रवक्ते विलास गोरे, बंटी नागरे, जुबेर मामू, दिपक गहिरवार, शासन कांबळे आदींनी सहभाग नोंदविला. तर औंढा येथे काँग्रेस कार्यकर्त्यांनी धान्य वाटप केले.

राम कदम मित्रमंडळाकडुन धान्य वाटप

हिंगोली येथील शिवसैनिक राम कदम मित्रमंडळाच्या वतीने अकोला बायपास येथे गरीबाना अन्नधान्य वाटप करण्यात आले. यावेळी शाम कदम, पंचायत समिती सदस्य संतोष गोरे , संजय मस्के, राहुल खिल्लारे, सुजित देशमुख, गणेश सोळंके, कैलास जाधव, रोहन लबडे, पवन दर्वेकर, बाळू घुगे, आकाश हल्ल बुर्गे व विजय अवचार हे उपस्थित होते.

आजरसोंडा येथे शिवसेनेची 400 कुटुंबाना मदत

औंढा नागनाथ तालुक्यातील आजरसोंडा येथे शिवसेनेचे जिल्हा परिषद गटनेते अंकुश आहेर यांच्या कडुन 400 कुटुंबांना लॉकडाउनच्या कारणामुळे नागरिकांना मार्केट बंद आसल्यामुळे साखर,गोडतेल,चना दाळ,मिठ,डेटॉल साबन, निरमा, कपड्याची साबन, पोहे, दंतमंजन, खोबरे तेल, ईत्यादी किराणा मालाची एक किट देण्यात आली. त्यावेळी अण्णा पाटिल, प्रल्हादराव आहेर, दिलीपराव राखोंडे, राजु आहेर , सचिन आहेर, शिवाजी आहेर, बाळु आहेर, बाळु पांडववीर, शामराव गायकवाड, संजय गायकवाड , सुखदेव जोंधळे इत्यादी उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या