कोकण रेल्वे कडून कोरोना विरूध्द लढण्यासाठी 1 कोटी 85 लाख 50 हजाराची मदत

427

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभर लॉगडाऊन सुरु आहे. कोरोना विरूध्द लढण्यासाठी सरकारला मदत करण्यासाठी अनेक कंपन्या, संस्था, सेलिब्रेटी पुढे येत आहेत. कोकण रेल्वेनेही मदतीकरिता पुढाकार घेतला असून कोकण रेल्वेच्या सीएसआर मधून कोरोना विरूध्द लढण्याकरिता पंतप्रधान निधीत कोकण रेल्वेने एक कोटी सहा लाख रूपयांची मदत देणार आहे. त्याचबरोबर कोकण रेल्वेचे सर्व कर्मचारी एक दिवसाचा पगार कोरोना विरूध्दच्या लढ्या करिता पंतप्रधान निधीत जमा करणार आहे. कोकण रेल्वेच्या कर्मचाऱ्यांच्या पगाराची रक्कम 79 लाख 50 हजार रुपये आहे. कोकण रेल्वेच्या सर्व गाड्या लॉगडाऊन मध्ये बंद आहेत. मात्र जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतुकीसाठी कोकण रेल्वे पार्सल गाड्या सुरु करत आहे. त्या गाड्यातून आंब्याचीही वाहतूक होणार होणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या