शरद पवार शुक्रवारी फेसबुक पेजवरून जनतेशी साधणार संवाद

कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे महाभयानक आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली आहे. त्या अनुषंगाने जनतेच्या मनात विश्वासाची भावना निर्माण व्हावी, त्यांच्या मनातील भीती दूर व्हावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आपल्या फेसबुक पेजवर दिनांक 27 मार्च 200 रोजी सकाळी 11 वाजता जनतेशी संवाद साधणार आहेत. राज्यातील वैद्यकीय सुविधा, आर्थिक संकट, कृषी उत्पन्न, कायदा व सुव्यवस्था, कामगारांच्या समस्या अशा आव्हानांबाबत शरद पवार आपल्या फेसबुक पेजवर बोलणार आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या