पुणे पोलिसांच्या वाहतूक विभागाकडून 800 मजूरांना अन्न पुरवठा

217

कोरोनाच्या पार्श्‍वभुमीवर संचारबंदी लागू केल्याने कामगार, मजूर व बेघरांची निवारा केंद्रामध्ये राहण्याची व्यवस्था करण्यात आली. पोलिसांच्या वाहतुक शाखेच्यावतीने विविध सामाजिक संस्थांच्या मदतीने निवारा केंद्रातील तब्बल 800 लोकांना अन्न पुरवठा करण्यात आला आहे.

शहरात लागू असलेल्या संचारबंदीमुळे गावी निघालेल्या कामगार, मजुर व बेघर व्यक्‍तींची पुणे पोलिसांच्यामदतीने महापालिकेने शहराच्या वेगवेगळ्या भागांमध्ये निवारा केंद्र, महापालिकेच्या शाळांमध्ये तात्पुरती राहण्याची व्यवस्था केली. परंतु निवारा केंद्रातील नागरीकांच्या जेवणाचा प्रश्‍न निर्माण झाला होता. वाहतुक शाखेचे अतिरीक्त पोलिस आयुक्त डॉ.संजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतुक शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल पाटील यांनी निवारा केंद्रातील लोकांना अन्न पुरवठा करण्यासाठी विविध सामाजिक व सेवाभावी संस्थांशी संपर्क साधला. त्यानुसार, विद्यार्थी सहाय्यक समितीचे विश्‍वस्त सुनील चोरे यांनी 300 लोकांसाठी दोन वेळेचे जेवण, सुधीर तन्ना यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत 14 एप्रिल पर्यंत 500 लोकांच्या एकवेळेच्या जेवणाची जबाबदारी घेतली. पोलिस निरीक्षक राजेश पुराणिक यांच्या माध्यमातूनही सर्व निवारा केंद्रांना अन्न पुरवठा केला जात आहे.

आपली प्रतिक्रिया द्या