रोजंदारीवर काम करणाऱ्या मजुरांच्या खात्यात थेट पैसे जमा केले जावेत – राहुल गांधी

2947
rahul-gandhi

आपला देश कोरोना व्हायरसशी लढा देते आहे. आज आपल्यासमोर असा प्रश्न उद्भवला आहे की, से काय करायला हवे ज्याने कमीत कमी जीवांची हानी होईल, असे काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले आहेत. ते ट्विट करून असे म्हणाले आहेत. परिस्थिती नियंत्रित करणे ही सरकारची खूप मोठी जबाबदारी आहे, असेही ते म्हणाले आहेत.

राहुल यांच्या मते कोरोनाशी लढा देण्यासाठी एकांतात राहणे आणि मोठ्या प्रमाणावर लोकांची कोरोना चाचणी करणे खूप महत्वाचे आहे. तसेच शहरी भागात आपत्कालीन तात्पुरत्या रुग्णालयाचा त्वरित विस्तार व्हायला हवा. याशिवाय या वैद्यकीय क्षेत्रात संपूर्ण आयसीयू सुविधा उपलब्ध असावी. ते म्हणाले आहेत की, रोजंदारीवर काम करणाऱ्या मजुरांना तातडीने मदतीची गरज आहे. त्यांच्या बँक खात्यात थेट पैसे जमा केले जावेत. तसेच त्यांना मोफत राशन दिले जावे. यामध्ये होणार कोणत्याही विलंब विनाशकारी ठरू शकतो.

ते पुढे म्हणाले की, देशात व्यापार पूर्णपणे ठप्प झाले आहेत. अशा परिस्थितीत नोकर्‍या सुरक्षित करण्यासाठी करात सूट आणि आर्थिक मदत दिली जावी. देशातील छोट्या-मोठ्या व्यापाऱ्यांना ठोस सरकारी आश्वासन देण्याचीही गरज आहे, असेही राहुल गांधी म्हणाले आहेत. दरम्यान, देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 606 वर पोहोचला असून यात १० जणांचा मृत्यू झाला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या