इस्राईलमध्ये तयार होतोय 11 कोटींचा शाही मास्क!

565

कोरोनाच्या संक्रमणापासून बचाव करण्यासाठी सध्या मास्क घालणे प्रत्येकाला बंधनकारक आहे. मास्कचे विविध प्रकार सध्या बाजारात उपलब्ध आहेत. परंतु सध्या सगळ्यांचे लक्ष वेधलेय ते इस्राईलमध्ये तयार होणाऱया जगातल्या सर्वात महागडय़ा शाही मास्कने. 18 कॅरेट सोनं आणि 3600 हिरे वापरून तयार करण्यात येणाऱया या मास्कची किंमत तब्बल 11 कोटी 23 लाख रुपये इतकी आहे.

इस्राईलमध्ये दागिने तयार करणाऱया यवेल या कंपनीने या शाही मास्कची निर्मिती करण्याचा किडा उचलला आहे. एका ग्राहकाच्या ऑर्डरनुसार हा मास्क तयार केला जाणार आहे. याबाबत ज्केलरी डिझायनर इस्साक लेव्हीन म्हणाले, ‘‘या मास्कसाठी एन 95 फिल्टरचा वापर करण्यात येत आहे. 18 कॅरेट सोने, सफेद आणि काळ्या रंगाचे 3600 हिरे वापरून हा मास्क सजवण्यात येईल. याचे वजन अंदाजे 270 ग्रॅम असणार आहे.’’ मालकाची ओळख सांगण्यास त्यांनी नकार दिला असला तरी अमेरिकेतील एका चिनी उद्योगपतीने या मास्कची ऑर्डर दिल्याचे त्यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या