कोरोना व्हायरसबाबत ‘आयओए’ सतर्क

259

जपानची राजधानी टोकियोमध्ये या वर्षी 24 जुलै ते 8 ऑगस्टदरम्यान ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा रंगणार आहे. मात्र या स्पर्धेवर कोरोना व्हायरसचे सावट असेल. त्या पार्श्वभूमीवर आपल्या खेळाडूंच्या सुरक्षेसाठी हिंदुस्थान ऑलिम्पिक महासंघ (आयओए) आतापासून सतर्क झाला आहे. खेळाडूंना वैद्यकीय सल्ला दिला जात असल्याची माहिती ‘आयओए’चे अध्यक्ष नरिंदर बत्रा यांनी दिली.

चीनमधून आलेला भयंकर कोरोना व्हायरस 25 हून अधिक देशांत पोहोचला आहे. चीनमध्ये आतापर्यंत 490 नागरिक या व्हायरसचे बळी ठरले आहे. त्यामुळे टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तोशिरो मुटो हेदेखील कोरोना व्हायरसमुळे चिंतीत झाले आहे.

यंदाची पदकसंख्या दोन आकडी असेल

यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये हिंदुस्थानी खेळाडू नक्कीच पदकांचा दुहेरी आकडा गाठतील. 2024 च्या ऑलिम्पिकमध्ये 20 हून अधिक, तर 2028 च्या ऑलिम्पिकमध्ये 40 हून अधिक पदकांचे आम्ही लक्ष्य ठेवणार आहोत. टोकियो ऑलिम्पिकमध्ये हिंदुस्थानला नेमबाजी, बॉक्सिंग, बॅडमिंटन व वेटलिफ्टिंग या खेळात पदकांची आशा आहे. – नरिंदर बत्रा

जोगेश्वरी येथील संजय स्पोर्टस् ऍकॅडमीच्या वतीने घेण्यात आलेल्या मॅरेथॉन स्पर्धेत अस्मिता संचालित राम गोपाल केडिया विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. श्रावणी मोहिते, श्रेया टेकाळे, सदिच्छा सावंत, अर्पिता राठोड, काव्य करंबत, मनस्वी बामगुडे, प्राजंल म्हात्रे, अर्णव ठाकूर या विद्यार्थ्यांनी स्पर्धेत ठसा उमटवला. याप्रसंगी संस्थेचे विश्वस्त दादा पटवर्धन, जगदीश सामंत, मुख्याध्यापिका रचना पवार, प्रदीप भोईर, डावरे गुरुजी, दीपक खानविलकर यांच्या उपस्थितीत विजयी खेळाडूंना गौरविण्यात आले.

आपली प्रतिक्रिया द्या