कोल्हापूर शहरात इराणहून परतलेला तरुण कोरोना पॉझिटिव्ह

364

इराणहून शनिवारी पहाटे परतलेल्या चौघांपैकी नागाळा पार्क परिसरातील एका 38 वर्षीय तरुणाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. तर अन्य तिघांचा अहवाल निगेटिव्ह आला. तब्बल 19 दिवसांनी कोरोना पॉझीटीव्ह सापडल्याने,शहर कोरोनामुक्त झाल्याच्या आनंदात असलेल्या कोल्हापूरकरांना धक्का बसला आहे.

या तरूणाच्या स्वॅबची चाचणी शेंडा पार्क येथील प्रयोगशाळेत करण्यात आल्याने,क्राॅस चेकिंगसाठी पुणे आणि मिरज येथील लॅबमध्ये पाठविलेले रिपोर्ट आल्यानंतरच अधिक स्पष्ट होणार आहे. सोशल मिडियातुन मिळालेल्या माहितीनुसार, इराणहुन आलेल्या काही जणांना राजस्थान येथे कोरंटाईन करण्यात आले होते. चौदा दिवसानंतर रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने,राजस्थान सरकारच्या परवानगीने जोधपूरहून यातील चौघेजण काल शनिवारी सकाळी चारजण पहाटे पाच वाजता मोटारीने आले.पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर किणी टोल नाक्यावर आले असता,त्यांना घरी न पाठवता जिल्हा प्रशासनाने थेट छत्रपती प्रमिलाराजे शासकीय रुग्णालयात दाखल करून, त्यांचे स्वॅब तपासणीसाठी शेंडा पार्क येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले.यातील तिघांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. तर एकाचा पाॅझीटिव्ह आला.रात्री उशीरापर्यंत याबाबत जिल्हा प्रशासना कडून अधिकृत माहिती देण्यात आली नव्हती. त्यामुळे गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती.क्राॅस चेकिंगसाठी पुणे आणि मिरज येथील लॅबमध्ये स्वॅब पाठविण्यात आल्याच्या वृत्ताला वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला आहे.

माहिती देण्यात प्रशासनाची दिरंगाई; सोशल मिडियातुन मात्र नावासह व्हायरल

इराणहुन कोल्हापूरात दाखल झालेल्या तरुणाचा कोरोना रिपोर्ट पाॅझीटिव्ह आल्याचे, वृत्त सोशल मीडियातुन समोर आले. तसेच या करोना बाधीताचे नाव आणि येथील निवासी पत्ताही सोशल मिडीयावर व्हायरल झाला. सर्वत्र लाॅकडाऊन सुरु असताना, तसेच जिल्हाबंदी व संचारबंदी असतानाही हे चौघेजण कोणाच्या परवानगीने कोल्हापूरात दाखल झाले ?, यांच्यासाठी विमानसेवा कशी सुरु झाली? असे अनेक उलट-सुलट प्रश्न सोशल मिडियातुन उपस्थित होत होते.मात्र याबाबत जिल्हा प्रशासनाकडून मौन बाळगण्यात आले.प्रसार माध्यमांनाही माहिती देण्यास विलंब आणि टाळाटाळ होत असल्याने, चिंतेचे वातावरण निर्माण होऊ लागले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या