चमकोगिरी करण्यासाठी मानहानी केली; भाजप नेत्याविरोधात तक्रार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मदत करतानाचा फोटो काढून फेसबुकवर प्रसिद्धी केल्याप्रकरणी भाजप नेता व जिल्हा परिषद सदस्य ब्रिजभूषण पाझारे यांच्या विरोधात गुन्हा दाखल. चंद्रपूर शहर पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल झाला असून, मानहानी केल्याच्या तक्रारीवरून तो दाखल करण्यात आला. संजय बेरुगवार या व्यक्तीने ही तक्रार केली. बेरुगवार हे रस्त्याने जात असताना पाझारे यांनी हातात मास्क दिले आणि फोटो काढून किराणा दिल्याचा फोटो फेसबुकवर टाकला. एका संपन्न घरची ही व्यक्ती आहे. मात्र त्यांचा फोटो जाहीरपणे मदत घेताना प्रसिद्ध झाल्यानं लोकांनी त्यांना टोमणे मारणं सुरू केलं. प्रारंभी हा प्रकार त्यांच्या लक्षातच आला नाही. मात्र जेव्हा त्यांनी फेसबुकवरील पोस्ट बघितली, तेव्हा पाझारे यांची चमकोगिरी त्यांच्या लक्षात आली. त्यामुळं लोकांच्या टोमण्यांनी व्यथित झालेल्या बेरुगवार यांनी लागलीच या प्रकाराची तक्रार शहर पोलिसात केली. त्यावरून मानहानी केल्याचा गुन्हा पाझारे यांच्यावर दाखल झाला.