गेवराई तालुक्यात 28  मेडीकल व एजन्सीवर छापे; सॅनिटायझर, मास्कचा साठा जप्त 

494
crime

कोरोना या विषाणूपासून संरक्षण करण्यासाठी लागणाऱ्या पी.पी किट सॅनिटायझर, मास्कची जादा दराने विक्री होत असल्याची माहिती, जिल्हा प्रशासनाला मिळाल्यानंतर गेवराई तालुक्यातील मेडिकल औषधीच्या एजन्सी व मेडिकलवर 28 ठिकाणी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या आदेशानुसार उपविभागीय अधिकारी नामदेव टिळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली 28 टीमने एकाच वेळी छापे टाकले. या कारवाईत प्रशासनाने सेनी टायझर व मास्क मोठ्या प्रमाणात जप्त केल्या असून यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे, ही कारवाई सोमवारी केली.

सध्या कोरोना या विषाणूमुळे संपूर्ण जग हादरलेले असताना या विषाणूपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी पी पी किट व सॅनिटायझर व मास्क याची नितांत आवश्यकता आहे. काही मेडिकल दुकानदार याचा काळ्या बाजारात विकण्यासाठी साठा करून  ठेवतात ग्राहकांची फसवणुक  व आर्थिक लूट होऊ नये म्हणून जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी उपविभागीय अधिकारी नामदेव टिळेकर यांना गेवराई तालुक्यातील मेडिकलवर व काही एजन्सीवर छापे टाकण्याचे आदेश दिले. उपविभागीय अधिकारी नामदेव टिळेकर यांनी 28 टिम एकाच वेळी तयार करून मेडिकल एजन्सी व मेडिकलवर एकाच वेळी तालुक्यात व शहरात छापे मारले, यावेळी त्यांच्या समवेत आरोग्य अधिकारी डॉ,संजय कदम नायब तहसीलदार प्रशांत जाधवर , तलाठी व मंडळ अधिकारी यांची टीम बनवण्यात आली, या टीमने एकाच वेळी सर्वत्र छापे मारले. यावेळी 125 मास्क, 100ml सॅनिटायझर बॉटल 3386 व 500ml,112 असा साठा आढळून आला. हा साठा वैध आहे की अवैध या तपासणी नंतरच, याची उपयुक्तता व विनियोग कसा करायचा हे जिल्हाधिकारी ठरवतील, अशी माहिती नायब तहसीलदार प्रशांत जाधवर  यांनी दिली. त्यांच्या आदेशानुसार पुढील निर्णय होईल असेही ते म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या