ठाणेकरांना मॉर्निंग वॉक पडले भारी; पोलिसांचा योगा दणका.. 

525

ठाण्यात कोरोनाची साथ जोरात पसरत असतानाही  काही महाभागांना परिस्थितीचे गांभीर्यच समजत नसल्याचे पुन्हा समोर आले आहे. कधी भाज्या तर कधी जीवनावश्यक वस्तू आणण्यासाठी लोकं घराबाहेर गर्दी करत असतानाच आता मॉर्निंग वॉकसाठी फेरफटका मारत आहेत. अशा हौशी मंडळींना आज पोलिसांनी चांगलीच योगा अद्दल घडवली. रस्त्यावर फिरणाऱ्या या मंडळींना ताब्यात घेऊन बसडेपो मध्ये त्यांच्याकडून कडक योगाभ्यास करून घेतला.

कोरोनावर सध्यातरी सोशल डिस्टनसिंग अर्थात एकमेकांमध्ये अंतर ठेवणे हा एकमेव उपाय असल्याने संपूर्ण देश घरात बंद आहे. परंतु आज सकाळी लोकमान्यनगर येथील काही हौशी मंडळी मॉर्निंग वॉक साठी बाहेर पडली आणि पोलिसांच्या हाती लागली. या सर्वाना पोलिसांनी लोकमान्यनगर बस डेपो येथे नेले व तेथे त्यांच्याकडून चक्क योगाभ्यास करून घेतला. गेले होते चालायला पण योगा करून परतले अशी त्यांची परिस्थती झाली होती. यापुढे आणखीन कडक पाऊले उचलणार असल्याचे सूतोवाच सरकारने केलेला असल्याने अशा बेशिस्त लोकांना घरीच बसण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या