लॉकडाऊनमध्ये ‘पाणीपुरी’ला करताय मिस? तर या एटीएमला द्या भेट…

देशभरात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. यामुळे अनेक लोकांनी विषाणूंपासून बचाव करण्यासाठी सावधगिरी बाळगण्यास सुरवात केली आहे. ‘लॉकडाऊन’ आणि ‘वर्क फॉर्म होम’मुळे अनेक जण आपले आवडते खाद्यपदार्थ मिस करत आहेत. मात्र अशातच पाणीपुरी खाणाऱ्यांसाठी एक चांगली बातमी समोर आली आहे.

आतापर्यंत तुम्ही ‘एटीएम’ मधून फक्त पैसे निघताना पाहिले आहेत. मात्र आता एटीएममधून ‘पाणीपुरी’ही निघताना तुम्हाला पाहायला मिळणार आहे. काय ऐकून थक्क झालात ना? मात्र हो हे खरं आहे. पाणीपुरीच्या शौकीनांसाठी एक एटीएम मशीन लॉन्च करण्यात आली आहे. या मशीनमध्ये पैसे टाकून तुम्ही आपली आवडती पाणीपुरी खाऊ शकता. या एटीएमच्या माध्यमातून तुम्ही कोणत्याही मानवी स्पर्शाशिवाय पाणीपुरी खाऊ शकता.

या ‘पाणीपुरी एटीएम’चा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ही मशीन गुजरामधील एका तरुणाने बनवली आहे. या तरुणाने सांगितलं की, ही मशीन तयार करण्यास त्याला सुमारे 6 महिन्याचा कालावधी लागला आहे. या मशीनच्या साहाय्याने कोरोना काळात कुणाच्या संपर्कात न येताही तुम्ही पाणीपुरीचा आनंद घेऊ शकता. मात्र हो या मशिनकडे तुम्हाला एक्स्ट्रा पुरी आणि पाणी मागता येणार नाही.

आपली प्रतिक्रिया द्या