परभणी जिल्ह्यातील ढालेगाव पोस्ट नाक्यावरील पोलिसांचीही तपासणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

परभणीच्या त्या रुग्णाचा पुणे ते परभणी असा झालेला प्रवास याचा तपास घेतल्यानंतर बीड आणि परभणी जिल्ह्यातील पोलिसांची वैद्यकीय तपासणी करण्यात येत आहे. विशेष म्हणजे या रुग्णाचा अनेकांशी संपर्क आला. त्यांचीही तपासणी केली जात आहे. तसेच या रुग्णाची तपासणी करणाऱ्या डॉक्टरांची व नर्सेसची देखील तपासणी होत असल्याची माहिती जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिली.

एक दिवसांपुर्वी परभणीत एक 21 वर्षीय कोरोनाग्रस्त पॉझिटीव्ह असल्याचा आढळून आला होता. या कोरोनाग्रस्ताचा पुणे ते परभणी या प्रवासादरम्यान बीड जिल्ह्याच्या हद्दीत विविध चेकपोस्टवर कर्मचार्‍यांशी संपर्क आल्याने अशा एकूण 12 कर्मचार्‍यांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत अशी माहिती मिळते आहे. बीड मधुन पाथरी मार्गे त्याचा परभणीला प्रवास झाला असल्याने पाथरी पोस्ट नाक्यावरील पोलीस कर्मचाऱ्यांना देखील वैद्यकीय चाचणीला सामोरे जावे लागले आहे.

यासंदर्भात अधिक माहिती देताना जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर म्हणाले की, हा रुग्ण पुणे येथून मोटरसायकलने निघाला होता. नगर मार्गे बीड कडे येत असताना मातोरी या गावाजवळ थांबला. तेथे त्याने आपल्याला प्रचंड भूक लागलेली आहे खायला द्या अशी त्याने मागणी केली.