कोविडसंदर्भात राज्यात 1 लाख 41 हजार गुन्हे दाखल; गृहमंत्री अनिल देशमुख यांची माहिती

लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोविडसंदर्भात कलम 188 नुसार 1 लाख 41 हजार गुन्हे दाखल झाले आहेत. विविध गुन्ह्यांसाठी 12 कोटी 25 लाख 11 रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

  • अत्यावश्यक सेवेसाठी 5 लाख 48 हजार 005 पास पोलिसांमार्फत देण्यात आले आहेत.
  • राज्यात लॉकडाऊनच्या म्हणजे 22 मार्च ते 2 जुलै या कालावधीत
  • पोलिसांवर हल्ला होण्याच्या घटना – 292 (861 व्यक्ती ताब्यात)
  • 100 नंबरवर आलेले फोन – 1 लाख 05 हजार
  • पोलिसांनी हातावर क्वारंटाईन शिक्का मारून विलगीकरणात पाठविलेल्या–७८३.
  • अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांवर दाखल गुन्हे – 1335
  • जप्त केलेली वाहने – 86 हजार 663
  • कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखताना मृत्युमुखी पडलेले पोलीस – 62

मुंबईतील 38 पोलीस व 1 अधिकारी असे एकूण 39, पुणे 3, सोलापूर शहर 3, नाशिक ग्रामीण 3, नाशिक शहर 1, एटीएस 1, मुंबई रेल्वे 3, ठाणे 3, ठाणे ग्रामीण 1 पोलीस व 1 अधिकारी, जळगाव ग्रामीण 1, पालघर 1, जालना 1 अधिकारी, धाराशिव- 1

  • कोरोना बाधित पोलीस – 123 पोलीस अधिकारी व 914 पोलीस कर्मचारी

सोशल डिस्टेन्सिंग पाळा

कोरोना विरुद्धच्या लढाईत राज्यातील प्रत्येक नागरिकाचा सहभाग हा अपेक्षित आहे. तसेच सोशल डिस्टेन्सिंग पाळण्याची मोठी जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. सर्वांनी नियम पाळून सहकार्य करावे, असे आवाहन गृहमंत्र्यांनी केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या