कोरोनाच्या अदृश्य शत्रूशी लढा देण्यासाठी पोलीसांसह माजी सैनिकही सज्ज; 219 माजी सैनिकांचा पुढाकार

322

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना या अदृश्य शत्रूशी लढा देण्यासाठी पोलीसांच्या खांद्याला खांदा लाऊन उभे राहण्यासाठी माजी सैनिकांनी देखील पुढाकार घेतला आहे. सिमेवर व संकट काळात देश रक्षणाचे कर्तव्य बजावून सेवानिवृत्त झालेले जिल्ह्यातील 219 माजी सैनिकांनी पुढाकार घेतला असल्याची माहिती जय हिंद सैनिक सेवा फाऊंडेशनचे अध्यक्ष शिवाजी पालवे यांनी दिली.

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा पोलीस दलाच्या वतीने पोलीसांबरोबर कर्तव्य बजाविण्यासाठी इच्छुक माजी सैनिकांची नांवे मागवून घेण्यात आली होती. यामध्ये जय हिंद सैनिक सेवा फाउंडेशन नगर शहर, कर्जत माजी सैनिक संघटना, पारनेर जय हिंद फाउंडेशन, अकोले माजी सैनिक संघटना, श्रीगोंदा माजी सैनिक संघटना, राहुरी जय हिंद फाऊंडेशन, शिर्डी माजी सैनिक संघटना, नेवासा माजी सैनिक संघटना, पाथर्डी माजी सैनिक संघटना, संगमनेर माजी सैनिक संघटना, कोपरगाव माजी सैनिक संघटना, राहाता माजी सैनिक संघटना, अहमदनगर माजी सैनिक संघटना, माजी सैनिक बहुद्देशीय संस्था भिंगार, जामखेड माजी सैनिक संघटना आदि सर्व संघटनेच्या सदस्यांचा समावेश असलेल्या 219 माजी सैनिक कोरोनाशी लढा देण्यासाठी सज्ज झाले आहेत. अजूनही अनेक सैनिक या महामारीत आपले योगदान देण्यास इच्छुक आहेत.

कर्जतमध्ये 30 माजी सैनिकांची एक तुकडी कार्यान्वित झाली असून, जिल्ह्यात देखील पोलीसांच्या मदतीला माजी सैनिक सहकार्य करणार आहे. माजी सैनिकांनी देशसेवेसाठी घेतलेल्या पुढाकाराबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. पोलीसांना सहकार्य करण्यासाठी माजी सैनिक संघटनेचे शिवाजी पालवे, संतोष शिंदे, तैय्यब बेग, गोपिनाथ डोंगरे, सहदेव घनवट, अशोक चौधरी, प्रभाकर जगताप, ताराचंद गागरे, प्रकाश ठोकळ, शिवाजी गर्जे, भाऊसाहेब कर्पे, रमेश जगताप, भाऊसाहेब रानमाळ, भारत खाकाळ, कुशल घुले आदि सहकार्य करीत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या