जळगावात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचा मृत्यू

702

जळगाव जिल्ह्यातील दोन व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल प्राप्त झाला होता. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असतानाच एका कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचा गुरुवारी 2 एप्रिल रोजी मृत्यू झाल्याच समोर आले आहे. जळगाव जिल्ह्यात आता कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची मृत्यूची संख्या ही एक झाली आहे. त्याचा गुरुवारी दुपारी अडीच वाजता उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे.  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ भास्कर खैरे यांनी या माहितीला दुजोरा दिला आहे. जिल्हावासियांनी गांभीर्य लक्षात घेऊन लाॅकडाऊनचे तंतोतंत पालन करावे असे आवाहन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले आहे

आपली प्रतिक्रिया द्या