रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाचा चौथा बळी; रूग्णसंख्या 125 वर

फोटो- प्रातिनिधीक

रत्नागिरी जिल्ह्यात आणखी 11 कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण सापडले असून एका कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या 125 वर पोहचली आहे. मिरज येथून काल प्राप्त अहवालामध्ये आलेले नाव कामथे येथील एका रुग्णाचे दाखविले होते. कामथे येथून जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या कार्यालयाला वेगळेच नाव पाठविण्यात आले होते. त्यामुळे आडनाव भिन्नतेचा प्रश्न आला. यावर कामथे रुग्णालयातून माहिती पाठविताना दोन्हीकडे वेगळी आडनावे पाठविली असल्याचे मान्य करण्यात आले. सदर व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे. मात्र आडनावातील गोंधळामुळे गुरुवारी जाहीर आकडेवारीत एकूण कोरोना पॉझिटिव्ह संख्येत त्याचा समावेश करण्यात आला नाही. हा समावेश याबाबतची माहिती घेतल्याने शुक्रवारी करण्यात आला. त्यामुळे पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या या घडीस 125 दाखविण्यात आली असल्याचा खुलासा जिल्हा सामान्य रुग्णालयातर्फे करण्यात आला आहे.

जिल्हयात कोरोना तपासणीसाठी 4951 नमूने घेण्यात आले होते त्यापैकी 125 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. 4508 अहवाल निगेटिव्ह आले असून 310 अहवाल प्रलंबित आहेत. उपचारानंतर 33 जण बरे झाले असून चार जणांचा मृत्य झाला आहे. सध्या 88 रूग्ण उपचार घेत आहेत. जिल्हयात येण्यासाठी 45 हजार अर्ज एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात येण्यासाठी बाहेरून 45 हजार 853 अर्ज आले आहेत. जिल्हयातून बाहेर जाण्यासाठी अर्जांची संख्या 56 हजार 314 आहे. जिल्हयात शुक्रवारी अखेर होम क्वारंटाईन असणाऱ्यांची संख्या 52 हजार 922 आहे. संस्थात्मक क्वारंटाईन खाली असणाऱ्यांची संख्या 139 आहे.

आपली प्रतिक्रिया द्या