कोरोनाव्हायरसच्या भीतीने साईबाबा संस्थानच्या कर्मचाऱ्यांची बायोमेट्रिक हजेरी बंद

730
shirdi-trust

शिर्डीत दररोज हजारो भाविकांची गर्दी होत असल्याने कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी साईबाबा संस्थानकडुन विवीध उपाययोजना केल्या जातायत. भाविकांना संसर्ग होऊ नये यासाठी बॉयोमेट्रीक टाईमदर्शन पास आणि सशुल्क पास देताना आता थंब देण्याची गरज भासणार नाही. विना थंब आता पास विपरीत केले जातायत. गुरूवारी सायंकाळी सात वाजतापासून सदर अंमलबजावनी करण्यात येतेय. यासोबत संस्थानच्या कर्मचाऱ्यांची बॉयोमेट्रीक हजेरी काही दिवसांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.

साईबाबा संस्थानकडुन कोरोनाच्या पार्श्वभुमीवर खबरदारी घेतली जात आहे. वेळोवेळी साफसफाई केली जातेय. दर्शनरांगेत सँनेटाझरची व्यवस्था करण्यात आलीय तर लवकरच ताप मोजण्यासाठी दर्शनरांगेच्या बाहेर नॉन कॉनटेक्ट थर्मामीटरने दर्शनासाठी येणा-या भाविकांची तपासणी केली जाणार आहे. त्यासोबत भाविकांना संसर्ग होऊ नये यासाठी बॉयोमेट्रीक टाईम दर्शन पास, सशुल्क पास देताना फक्त फोटोवरच पास दिले जातायत. अंगठा देण्याची सक्ती मागे घेण्यात आलीय. या निर्णयाच साईभक्तांनी स्वागत केलय.

आपली प्रतिक्रिया द्या