जालना – जिल्हा रुग्णालयात तीन रुग्ण नव्याने दाखल

638

जिल्ह्यामध्ये १ एप्रिल, 2020 रोजी तीन रुग्ण नव्याने दाखल झाले आहेत. आतापर्यंत एकुण 92 रुग्ण विलगीकरण कक्षात दाखल होते. त्यापैकी 92 रुग्णांचे स्वॅब घेण्यात आले आहेत. त्यापैकी 88 रुग्णांचे अहवाल निगेटीव्ह प्राप्त झालेले असुन तीन रुग्णांने अहवाल रिजेक्ट तर चार रुग्णांचे अहवाल प्रलंबित आहेत. आजरोजी आठ रुग्ण विलगीकरण कक्षामध्ये दाखल असुन त्यांची प्रकृती स्थिर आहे.

रुग्णालयातुन डिस्चार्ज झालेल्या तसेच परदेशी प्रवासाचे पुर्व इतिहास असणा-या सर्व व्यक्तींचे घरी अलगीकरण करण्यात आलेले आहे. आजपर्यंत 113 परदेश प्रवास केलेल्या व्यक्तींपैकी 112 व्यक्तींचे घरीच अलगीकरण करण्यात आलेले आहे. तसेच इतर शहरे व राज्यातुन आपलेल्या 12 हजार 969 व्यक्तींची तपासणी करुन त्यांचे घरीच अलगीकरण करण्यात आले आहे. संस्थेत अलगीकरण केलेल्या सहवासितांची (Contact) संख्या 157 असुन संत रामदास मुलांचे शासकीय वसतीगृह येथे 50, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्टेल- 39, मुलींचे शासकीय वसतीगृह-52 व अंजता ब्लॉक पोलीस प्रशिक्षण केंद्र येथे 16 जणांना दाखल करण्यात आलेले असल्याची माहिती जिल्हा प्रशासनामार्फत देण्यात आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या