महापौरपदाची सोडत यंदा नव्याने, कोणत्या प्रवर्गाला लॉटरी… सर्वांचे लक्ष

महानगरपालिकेच्या निवडणुकीची एकीकडे तयारी सुरू असताना दुसरीकडे महापौरपदाच्या लॉटरीच्या हालचाली सुरू आहेत. महापालिकेच्या प्रभागाची लॉटरी यंदा नव्याने काढली होती. त्याच धर्तीवर महापौरपदाच्या आरक्षणासाठी नव्याने लॉटरी काढण्यात येणार आहे. त्यामुळे कोणत्या प्रवर्गाला आरक्षणाची लॉटरी लागणार याकडे सर्व राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूक प्रचारात सध्या रंग भरण्यास सुरुवात झाली आहे. ईव्हीएम मशिन्स, शाई-टेबले, मतदान पेंद्रे, मतदानासाठी आवश्यक कर्मचारी वर्ग, पोलीस कर्मचारी अशा सर्व तयारी सुरू आहे. त्याचवेळेस महापौरपदाच्या लॉटरीचीही आखणी सुरू आहे. कारण मुंबई महापालिकेच्या महापौरपदाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेले असते.

आतापर्यंत महापौरपदाची लॉटरी चक्राकार पद्धतीने काढली होती, पण या वर्षी वॉर्ड आरक्षणाच्या धर्तीवर नव्याने काढण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

मुंबईचे मागील 10 महापौर

1998

नंदू साटम (ओबीसी)

1999

हरेश्वर पाटील (सर्वसाधारण)

2002

महादेव देवळे (एससी)

2004

दत्ता दळवी (सर्वसाधारण)

2007

डॉ. शुभा राऊळ (ओबीसी महिला)

2009

श्रद्धा जाधव (सर्वसाधारण महिला)

2012

सुनील प्रभू (सर्वसाधारण)

2014

स्नेहल आंबेरकर (एससी महिला)

2017

विश्वनाथ महाडेश्वर (ओबीसी)

2020

किशोरी पेडणेकर (ओबीसी)