अहमदपूर – कापसावर रोगाचा प्रादुर्भाव, शेतकऱ्यांसमोर दुहेरी संकट

414

अहमदपूर तालुक्यात दुष्काळात तग धरून अल्प पावसामुळे वाढ खुंटलेल्या कापसावर मावा नागआळीचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे कीटक नाशक औषध फवारून शेतकरी पिकाचे संरक्षण करण्याचा प्रयत्न असफल होत आहे.

तालुक्यात सध्या ढगाळ वातावरण असून आठ दिवसापासून पावसाचा शिडकाव सुध्दा नाही त्यामुळे शेतकरी मोठ्या पावसाची आस धरुन बसले आहेत. मध्यंतरी पडलेल्या थोड्या बहुत पावसाने वाढ होण्यास थोडी मदत झाली असली पाण्याअभावी एक महिना उशिरा लागवड केलेल्या कापसावर किडीच्या प्रादुर्भावाने नुकसानीची शक्यता वाढली आहे. वातावरण असेच कायम राहिले तर कापूस व इतर पिके हातची जाण्याची शक्यता कायम आहे.

गेल्या पाच – सहा दिवसांपासून मावा, तुडतुडे, नाग आळी हे पानाचे रस शोषण करीत असल्यामुळे पाने लाल, पांढरट दिसत आहेत. यावर्षी पावसाने उघडीप दिल्याने कपाशीची वाढ खुंटलेली आहे त्यातच रोगाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. त्याचबरोबर पावसाने उघडीप दिल्यामुळे दुपारच्या वेळी पिके माना टाकत आहेत शेतकरी मोठ्या पावसाची प्रतिक्षेत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या