व्हिसाशिवाय करू शकता ‘या’ देशांची सफर

4112

परदेशात प्रवास करायचा म्हणजे सर्वात आधी आपल्या बजेटसोबतच तेथील व्हिसाचा देखील विचार करावा लागतो. आशियाई देश सोडले तर अनेक देशांचा व्हिसा मिळणं ही फार किचकट प्रक्रिया आहे. त्यामुळे व्हिसाशिवाय जर तुम्हाला परदेशातील काही सुंदर देशांमध्ये फिरता आले तर किती बरं होईल. आज असेच काही देश आम्ही तुम्हाला सांगणार आहोत जिथे तुम्हाला व्हिसा शिवाय प्रवास करता येणार आहे.

मकाऊ

macau-2 पीपल्स रिपब्लिक ऑफ चीनचा भाग असलेला मकाऊ हा देश चीनच्या दक्षिण किनाऱ्यावरील पर्ल नदीच्या काठावर वसलेला आहे. त्यामुळे या देशाला मुळातच निसर्ग सौंदर्य लाभलेलं आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कॅसिनो आणि रिसॉर्ट्स आहेत. याला ‘वेगास ऑफ चीन’ म्हणूनही ओळखले जाते. येथील स्थानिक भाषा कॅन्टोनीज आहे. या प्रदेशात अनेक वर्षांपूर्वी पोर्तुगिजांचे राज्य होते त्यामुळे तेथील संस्कृतीमध्ये पोर्तुगिजांची छाप दिसते. मकाऊमध्ये व्हिसाशिवाय 30 दिवस राहता येते. तेथे मॅकेनीज पटाका हे चलन चालते. 1 मॅकेनीज पटाका म्हणजे अंदाजे 9 रुपये होतात. त्यामुळे तशी खिशाला परवडणारी देखील ही टूर आहे. मार्च ते मे आणि सप्टेंबर ते नोव्हेंबर या दरम्यान या देशाला भेट देऊ शकता.

फिजी बेटे

fiji 330 पेक्षा जास्त बेटांचा द्वीपसमूह असलेला फिजी देश हा जगातील सुंदर देशांपैकी एक मानला जातो. या देशात देखील पर्यटकांना व्हिसाशिवाय प्रवेश दिला जातो. त्यामुळे या देशात मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात. पर्यटन हा तेथील जनतेचा मुख्य व्यवसाय आहे. फिजीमध्ये व्हिसाशिवाय 120 दिवस राहता येते. तेथे फिजीयन डॉलर हे चलन वापरले जाते. 1 फिजी डॉलर म्हणजे 32 रुपये. जुलै ते सप्टेंबरमध्ये या देशाला भेट देण्याचा योग्य काळ आहे.

सामोआ

samoa सामोआ हा एक सुंदर बेट देश आहे. या देशाची संस्कृती इतर देशांपेक्षा थोडी वेगळी आहे. इथले पुरुष आपल्याला महिलांसारखे स्कर्ट घातलेले दिसतील. इथे गॅस सिलिंडर पेक्षा जमिनीखाली धग देऊन अन्न शिजवले जाते. चारी बाजूंनी समुद्राने वेढलेले असल्यामुळे मनसोक्त पोहता येते तसेच इथे समुद्रकिनाऱ्यांवर झोपता देखील येते. 60 दिवसांपर्यंत या देशात राहण्यासाठी व्हिसाची गरज लागत नाही. मोन ताला (डब्ल्यूएसटी) हे चलन या बेटावर वापरले जाते. एक डब्ल्यूएसटी म्हणदे अंदाजे 2 रुपये आहेत.

कूक बेट

cook-island

समुद्रकिनारे, धबधबे, डोंगर दऱ्यांची आवड असलेल्या पर्यटकांनी नक्कीच कूक बेटाला भेट द्या. अप्रतिम निसर्ग सौंदर्य, साहसी जीवन अनुभवायचे असेल तर हे बेट तुमच्यासाठी परफेक्ट आहे. इथे आजही पारंपारिक नृत्यकला सादर केल्या जातात. या बेटावर व्हिसाशिवाय 31 दिवस राहता येते. इथे कुक आयलँड डॉलर हे चलन वापरले जाते. एक कूक आयलँड डॉलर म्हणजे अंदाजे 45 रुपये.

जमैका

jamaicaa समुद्र किनारा, डान्स, बिअर, मजामस्तीची आवड असलेल्या लोकांसाठी जमैका हा देश परफेक्ट टुरिस्ट डेस्टिनेशन आहे. येथील संस्कृतीच मुळात स्वच्छंद असल्याने तेथे पर्यटक एकदम खूष असतात. त्यामुळे या देशाला पर्यटकांची मोठ्य प्रमाणात पसंती मिळते. मात्र इथे फक्त 14 दिवसच व्हिसाशिवाय राहता येते. पण जमैकातील एक डॉलर म्हणजे 0.53 पैसे त्यामुळे हा देश हिंदुस्थानी पर्यटकांच्या खिशाला परवडणारा देश आहे.

आपली प्रतिक्रिया द्या