
आपल्या वेगवान आणि स्विंग गोलंदाजीने दिग्गज फलंदाजांना नाचवणारा इंग्लंडचा माजी गोलंदाज जेम्स अँडरसन पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. जगातिल दिग्गज गोलंदाजांमध्ये अँडरसनच्या नावाचा समावेश केला जातो. आपल्या गोलंदाजीचा दबदबा त्याने साऱ्या जगाला दाखवून दिला आणि त्याने जुलै 2024 साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. मात्र, देशांतर्गत प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याने खेळणे सुरू ठेवले. काउंटी चॅम्पियनशिपसाठी (County Championship) आगामी हंगामासाठी त्याच्यावर कर्णधार पदाची मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आह.
मॅच फिक्सिंगचा विळखा! हिंदुस्थानचे चार खेळाडू तात्काळ निलंबीत, क्रिकेट जगत हादरलं; गुन्हा दाखल
काउंटी चॅम्पियनशिपमध्ये लंकाशायर क्लबने जेम्स अँडरसनला आपला पूर्णवेळ कर्णधार म्हणून निवडलं आहे. सध्या अँडरसने वय 43 वर्ष असून नवीन हंगामादरम्याने तो 44 वर्षांचा होईल. त्यामुळे वयाच्या 44 व्या वर्षी अँडरसनचा खेळ आणि फिटनेस पाहण्यासाठी चाहते उत्सुक असतील. जेम्स अँडरससने 2002 साली लंकाशायर क्लबकडून काउंटी चॅम्पियनशिपमध्ये पदार्पण केले होते. त्याने क्लबसाठी काही सामन्यांमध्ये कर्णधारपदाची जबाबदारी यापूर्वी पार पाडली आहे. मात्र, पुढील हंगामासाठी जेम्स अँडरसन पूर्णवेळ कर्णधार म्हणून आपली जबाबदारी पार पाडणार आहे. क्लबच्या या निर्णयावर जेम्स अँडरसननेही सकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे. तो म्हणाला की, “मागील हंगामात लंकाशायरचे कर्णधारपद भुषवणे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. नवीन हंगामात पूर्णवेळ ही भूमिका स्वीकारताना मला अभिमान आहे. मी एप्रिलमध्ये नवीन काउंटी चॅम्पियनशिप हंगामासाठी संघाचे नेतृत्व करण्यासाठी उत्सुक आहे.” असं जेम्स अँडरसन म्हणाला आहे.


























































