शेतीच्या कारणावरून पती-पत्नीस मारहाण, 4 जणांवर गुन्हा दाखल

23

सामना प्रतिनिधी, लातूर

शेतीच्या कारणावरून चौघांनी संगनमत करून पती-पत्नीस मारहाण केल्याची घटना रेणापूर तालुक्यातील मौजे पानगाव येथे घडली. रेणापूर पोलीस ठाण्यात या मारहाण प्रकरणी 4 जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

गोपाळ किशनराव पाटील (रा. सदाशिव पेठ, पुणे) हे आपल्या गावी पानगाव येथे पत्नीसह आले होते. शेत बटईने देण्यासाठी म्हणून ते आले असता गजानन किशनराव पाटील, मंगेश गजानन पाटील, अनंत किशनराव पाटील, श्रीहरी किशनराव पाटील (सर्वजण रा. पानगाव ता. रेणापूर) यांनी तू शेतामध्ये यायचे नाही, तुझ्या नावावर सातबारा नाही म्हणून शिवीगाळ केली. काठीने डोक्यात मारून डोके फोडले. फिर्यादीची पत्नी सोडवण्यासाठी आली असता तिलाही मारहाण करून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. या प्रकरणी चौघांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या