दाम्पत्याचा आयव्हीएफ क्लिनीकवर खटला; अयोग्य पद्धतीने मूल जन्मल्याचा दावा

47

सामना ऑनलाईन । कॅलीफोर्निया

आयव्हीएफ क्लिनीकच्या चुकीमुळे अयोग्य पद्धतीने मूल जन्मल्याचा दावा करत कॅलीफोर्नियातील एका दाम्पत्याने क्लिनीकविरोधात खटला दाखल केला आहे. अॅनी आणि अशॉक मॅन्युकॅन अशी त्या जोडप्याची नावे आहेत. आयव्हीएफ क्लिनीकमध्ये या जोडप्याच्या बिजांड्यांचे दुसऱ्या महिलेच्या गर्भाशयात रोपण करण्यात आले. तसेच अॅनी यांच्या गर्भाशयातही दुसऱ्या दाम्पत्यांच्या बिजाडांचे रोपण करण्यात आले. आयव्हीएफ क्लिनीककडून झालेल्या या चुकीसाठी त्यांनी क्लिनीकवर खटला भरला आहे. तसेच आपल्या बिजाडांतून जन्मलेल्या अपत्याचा ताबा मिळावा, यासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू केली होती. त्यानंतर मे महिन्यात त्यांना मुलाचा ताबा मिळाला आहे.

सीएचए फर्टिलीटी सेंटरमध्ये या दाम्पत्याने अपत्यप्राप्तीसाठी उपचार घेण्यास सुरुवात केली होती. या जोडप्याच्या बिजाडांचे सेंटरच्या चुकीमुळे दुसऱ्या महिलेमध्ये रोपण करण्यात आले. त्या महिलेची बिजांडे दुसऱ्याच महिलेमध्ये रोपण करण्यात आले. सेंटरच्या या चुकीमुळे तीन दाम्पत्यांना मनस्ताप सहन करावा लागला.

अॅनी यांच्या गर्भाशयात रोपण करण्यात आलेल्या चुकीच्या बिजाडांमुळे त्यांना गर्भधारणा झाली नाही. आपल्या बिजाडांतून जन्मलेल्या अपत्याबाबत या दाम्पत्याला माहिती नव्हती. या दाम्पत्याच्या बिजांडातून मार्चमध्ये अपत्य जन्माला आले होते. डीएनए चाचणीनंतर त्यांना समजले की, न्यूयॉर्कच्या एका दाम्पत्याकडे जन्मलेले अपत्य आपले आहे. त्यानंतर त्यांनी क्लिनीकविरोधात खटला दाखल करून आपल्या अपत्याचा ताबा मिळवण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू केली होती. त्यानंतर मे महिन्यात त्यांना या अपत्याचा ताबा मिळाला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या