धक्कादायक! कोरोनाच्या भीतीने पती-पत्नीची आत्महत्या, सुसाईड नोट मिळाली

2306

जगभरात कोरोनाचा हाहाकार सुरू असून 55 हजारपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला, तर 10 लाखांहून अधिक लोकांना याची लागण झाली आहे. दिवसेंदिवस ही महामारी रौद्र रूप धारण करत असून लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. अशातच पंजाबमधील अमृतसर येथे धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. कोरोना व्हायरसच्या भीतीने पती-पत्नीने आत्महत्या केल्याची प्रकार समोर आला आहे.

कोरोना व्हायरसच्या लक्षणाला घाबरून या दाम्पत्याने आत्महत्या केली आहे. याबाबत दाम्पत्याने लिहिलेली एक सुसाईड नोट पोलिसांना मिळाली असून यात त्यांनी आम्हाला कोरोनामुळे मरायचे नाही. कोरोनामुळे ताण वाढल्याने आम्ही आत्महत्या करण्याचा पर्याय निवडल्याचे असे म्हंटले आहे.

‘आज तक’ने दिलेल्या वृत्तानुसार, अमृतसरमधील बाबा बकालाच्या सठियाला गावात ही घटना घडली आहे. गुरजिंदर कौर आणि बलविंदर सिंग अशी मृत पती-पत्नीची नावे आहेत. पतीचे वय 65 तर पत्नीचे वय 63 असून दोघांनी विष पिऊन जीव दिला. दरम्यान, या दाम्पत्याचे शवविच्छेदन करण्यास डॉक्टरांनी नकार दिल्याने पेच निर्माण झाला.

आत्महत्या आणि हत्येच्या घटना
याआधी उत्तर प्रदेश मधील श्यामली येथे क्वारंटाईन वार्डात भरती असणाऱ्या एका संशयित रुग्णाने आत्महत्या केली होती. तसेच दिल्लीत भरती असलेल्या तबलीगी जमातच्या रुग्णाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. इटली मध्ये देखील एका प्रियकराने प्रेयसीला कोरोनाची बाधा झाली असा संशय व्यक्त करत तिची हत्या केली आणि स्वतः आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

आपली प्रतिक्रिया द्या