आनंदवार्ता; रशियाची लस 10 ऑगस्टपर्यंत येणार

2002

कोरोनावरील लस विकसित करण्याच्या स्पर्धेत रशिया बाजी मारणार आहे. जगात सर्वात आधी आपल्या लसीला मंजुरी देऊन 10 ऑगस्टपर्यंत ती लस बाजारात आणण्याचा निर्धार रशियाने केला आहे. ही लस सर्वप्रथम आरोग्य कर्मचाऱ्याना व नंतर जनतेला देण्यात येणार आहे. सध्या ही लस दुसऱ्या टप्प्यात असून 3 ऑगस्टच्या आसपास तिचा तिसरा टप्पा पूर्ण करणार असल्याचा दावा संशोधकांनी केला आहे.

मॉस्को येथील गामालेया इन्स्टिटय़ूटने लस तयार केली आहे. रशियाने कोरोना लसीच्या चाचण्यांबाबत नेमका तपशील जाहीर केलेला नाही.

आपली प्रतिक्रिया द्या