वापरात नसलेली डेबिट, क्रेडिट कार्ड रद्द

2571

बँकेचे डेबिट किंवा क्रेडिट कार्ड वापरून एकदाही ऑनलाइन व्यवहार न करणाऱ्यांचे कार्ड आजपासून निक्रिय होण्यास सुरुवात झाली आहे. या कार्डावर बँकेने दिलेली ऑनलाइन, कॉन्टॅक्टलेस व्यवहारांची सुविधा बँका काढून घेतील. मात्र या सुविधा नव्याने अर्ज करून सुरू करता येतील. डेबिट व क्रेडिट कार्ड यांचे क्लोनिंग करून किंवा त्यांचा पिन शोधून काढून त्याद्वारे कार्डधारकाच्या खात्यातून मोठय़ा रकमांचा अपहार करण्याचे प्रमाण सध्या वाढले आहे. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी तसेच या कार्डांची सुरक्षितता वाढवण्यासाठी रिझर्व्ह बँकेने 15 जानेवारी 2020 रोजी एक परिपत्रक प्रसिद्ध केले होते. त्यामध्ये ही कार्ड ऑनलाइन व्यवहारांसाठी एकदाही वापरली गेली नसतील तर त्यांची ही सुविधा 16 मार्चपासून थांबवण्यात याकी, असे बँकांना सांगण्यात आले होते. प्रत्यक्षात ते कधी निष्क्रिय करायचे याचा निर्णय कार्ड देणाऱ्या बँकांनी घ्यायचा आहे. त्यानुसार काही बँकांनी आपल्या कार्डधारकांना संदेश पाठवले आहेत. काही बँकांनी ही कार्ड 31 मार्चपर्यंत निक्रिय करण्यात येतील, असे म्हटले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या