इंग्लंडचा सनसनाटी विजय

321

वेस्ट इंडीजला 2-1 अशा फरकाने पराभूत करणाऱया इंग्लंडच्या क्रिकेट संघाने रविवारी पाकिस्तानवर 3 गडी राखून सनसनाटी विजयाला गवसणी घातली आणि वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी महत्त्वाच्या 40 गुणांची कमाई केली. पाकिस्तानने पहिल्या डावात 326 धावा फटकावल्यानंतर इंग्लंडचा पहिला डाव 219 धावांमध्ये गुंडाळण्यात त्यांना यश लाभले, पण पाकिस्तानला दुसऱया डावात मोठी धावसंख्या उभारता आली नाही. त्यांचा डाव 169 धावांमध्येच गडगडला. इंग्लंडसमोर विजयासाठी 277 धावांचे आव्हान उभे ठाकले. जोस बटलरने 75 धावांची आणि ख्रिस वोक्सने नाबाद 84 धावांची खेळी साकारत इंग्लंडच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

आपली प्रतिक्रिया द्या